बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही काही वर्ष अभिनय क्षेत्रासून दूर राहिली.आता ती पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. कोरियोग्राफर आणि चित्रपट निर्माता रेमो डिसूजा यांच्यासोबत ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये परीक्षकाच्या भूमिकेतून उर्मिला ही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता उर्मिला या शोमध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
एका मुलाखतीमध्ये उर्मिलानं सांगितलं, ‘डीआयडी सुपर मॉम्स या नव्या जर्नीची सुरूवात करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी या कार्यक्रमाचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो. हा कार्यक्रम नृत्याची आवड असणाऱ्या महिलांसाठी खास असणार आहे. मी रेमोसोबत या कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी आणि सुपर मॉम्सचे परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहे. ‘
‘डीआयडी सुपर मॉम्स’ च्या ऑडिशन्सला सुरुवात देशभरात ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला सुरुवात झाली आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता, भोपाळ, चंदीगड, लखनौ आणि गुवाहाटी या शहरांमध्ये ‘डीआयडी सुपर मॉम्स’ कार्यक्रमाचे ऑडिशन्स होणार आहेत.
अभिनय क्षेत्रातामधून ब्रेक घेण्याबाबत उर्मिलाला एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दिले,’मी अभिनय क्षेत्रात काम करणं सोडलं नाही. पण आयुष्यात अनेक टप्पे येत असतात. मी त्या सर्व टप्प्यांना सामोर जात आहे. जेव्हा मी लग्न केले. तेव्हा मला एन्जोय करायचे होते. मला आयुष्य साचेबद्ध पद्धतीनं जगायला आवडतं नाही. ‘