अभिनेत्री उर्फी जावेद हीच प्रकरण सध्या चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर निशाणा साधत तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशात उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक चकमक काही थांबायचं नावं घेत नाहीये. आधी उर्फीनं ट्विटवरून चित्रा वाघ यांना वारंवार डिवचण्याचा प्रयत्न केला. आता चित्रा वाघ देखील संधी मिळेल तिथे उर्फीला सुनावताना दिसत आहेत. या प्रकरणात पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी उर्फीला खडे बोल सुनावत रुपाली चाकणकरांवरही निशाणा साधला आहे.
चित्रा वाघांनी केलेल्या पोलीस तक्रारीनंतर उर्फीला अंबोली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. त्या आधी उर्फीनं चित्रा वाघ यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करत रुपाली चाकणकर यांची भेट घेतली होती. आता पोलिसांनी उर्फीची चौकशी केल्यानंतर महिला आयोगानं उर्फीच्या तक्रारीची दखल घेत मुंबई पोलिसांनी उर्फीला सुरक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. महिला आयोगानं मुंबई पोलीस आयुक्तालयाला पत्र लिहित ही मागणी केली.
महिला आयोगानं उर्फीच्या सुरक्षेची मागणी केल्यानंतर चित्रा वाघ यांनी दोघींवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ‘तिने तक्रार कुठं द्यावी आणि कशाला हा तिचा प्रश्न आहे. माझा एकच विषय आहे. बाई कपडे घाल आणि फिर. तिला कोण मारहाण करणार?’.चित्रा वाघ यांनी पुढे म्हटलंय, ‘तिला पाठींबा देण्याऱ्यांनी तिला कपडे द्यावेत. चित्रपटाचा पेहराव तेव्हढ्यापुरता असतो. लोकांना उत्तेजीत करण्यासाठी नाही. महिला आयोगाला उत्तर दिलं आहे ते पब्लीश करा आणि लोकांना कळू द्या’.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुरुवातीला उर्फी जावेद प्रकरणात लक्ष घालण्यासाठी महिला आयोग वेळ वाया घालवणार अशी भूमिका घेतली होती. दरम्यान चित्रा वाघ यांनी महिला आयोगानं केलेल्या जुन्या नोटीसी आणि कारवाया समोर आणल्या होत्या. त्यात त्यांनी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिला अनुराधा वेब सीरिजच्या पोस्टरवरून अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी नोटीस बजावल्याचा खुलासा केला होता