केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

नवी दिल्ली – लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बिहारमध्ये निवडणुका सुरू असतानाच पासवान यांचं निधन झालं आहे.

आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करताना चिराग यांनी लिहिलं, “पप्पा, तुम्ही आता या जगात नाही. पण मला माहीत आहे, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल, मिस यू पप्पा.”

रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये ग्राहक संरक्षण मंत्री होते

ग्लोबल न्युज नेटवर्क: