मुंबई | नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीयेत अशातच राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानांतर या दोघांमध्ये वाद अधिक पेटलेले दिसून आले होते अशातच आता पुणे एकदा शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या राजकीय सत्ता-संघर्षावर बोट ठेवत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
गवत नाही, फुलत नाही, वास येत नाही असा चाफा मातोश्रीवर आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. मी इथे आलो आणि मला सत्कारच्या वेळी पुस्तक दिलं. मला पुरुषार्थ हे पुस्तक दिलं. हे पुस्तक मला नाही उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.
तसेच अडीच वर्ष काय त्यांनी केलं? असा सवाल करत राणे म्हणाले की, आता रोज फक्त शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. मी सांगेन की उत्तर देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका, कामं करा असा सल्ला देखील राणे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला. बाळासाहेब हे साहेब होते. साहेबांच्या नखाची सर देखील यांना नाही. कशाची सर देऊ यांना, कोळसाही म्हणू शकत नाही, असंही राणे म्हणाले.