उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना CBI चा मोठा दिलासा

उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना CBI चा मोठा दिलासा

मुंबई: बेकायदेशीर संपत्ती प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांना सीबीआयने (CBI) मोठा दिलासा दिला आहे. कोणतेही सबळ पुरावे नसल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केले आहेत. त्यामुळे आता श्रीधर पाटणकरांना दिलासा मिळाला आहे.

२०१७ मध्ये पुष्पक ग्रुपवर कारवाई केली होती. मात्र सीबीआयच्या तपासात कोणताही सबळ पुरावा मिळालेला नाही. या प्रकरणात श्रीधर पाटणकर यांचे नाव समोर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना हा धक्का मानला जात होता.

सीबीआयने दाखल केलेल्या अहवालात सबळ पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याआधी न्यायालयाने ऑक्टोबर २०२० मध्ये सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला होता. मात्र ईडीची (ED) चौकशी अजुनही कायम आहे. ईडीने या प्रकरणा पुष्पक बुलियन या कंपनीच्या चंद्रकांत पटेल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. मार्च महिन्यात ईडीने याच प्रकरणात पाटणकर यांच्या कंपनीच्या ६.५ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणली होती.

मनी लॉड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर असणारे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावरुन किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. सोमय्यांनी म्हटलं होतं की, उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम ही कंपनी आहे. यात मनी लॉड्रिंग करून पैसे आले आहेत. ही कंपनी पाटणकर यांची आहे. यात 29 कोटी काळा पैसा गुंतवला आहे. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय? हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

मार्च २०१७ रोजी पुष्पक बुलियन ग्रुप ऑफ कंपनी विरोधात मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. पुष्पक बुलियन या कंपनीचे संचालक महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांची २१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. महेश पटेल यांनी पुष्पक समुहातील २०.०२ कोटींचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला. नंदकिशोर यांच्यामार्फत साईबाबा गृहनिर्मिती कंपनीला ३० कोटींचे विनातारण कर्ज मिळाले. साईबाबा गृहनिर्मिती कंपनीचे मालक हे उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणर आहेत. त्यामुळे हा निधी पाटणकर यांना मिळाल्याचे बोलले जात आहे. पाटणकरांनी हे पैसे निलांबरी गुंकतवणूक केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ईडीने (ED) फ्लॅट जप्त केले होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: