‘त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं’, अयोध्येतून एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

 

मुख्यमंत्री एकनाथ शँडे आज अयोध्यामध्ये प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले आहे त्या पाठोपाठ आज उरने जोरदार स्वागत केले तसेच त्याच्या सोबत असंख्य सहकारी सुद्धा अयोध्येत दाखल झापमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्यामध्ये दाखल झाले आहे. या दोन्ही नेत्याचं उत्तरप्रदेशातील भाजपा सरकारने जंगी स्वागत केले. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत, त्यांचे आभार. राममंदिर ही आपली श्रद्धा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पुढे काँग्रेसवर टीका करताना शिंदे म्हणाले की, अयोध्येचा विकास वेगाने होत आहे. हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना वेदनाही होत आहेत. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदुत्वामुळे राजकीय दुकाने बंद होतील, असे अनेकांना वाटते. मंदिर बांधणार पण तारीख सांगणार नाही, असे बोलणाऱ्या लोकांना पीएम मोदींनी मंदिर बांधून उत्तर दिले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

पुढे उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने 14 वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला. गेल्या 8-9 महिन्यांत जे निर्णय झाले, ते अनेक वर्षात घेतले गेले नाहीत. आमचे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, विद्यार्थी, महिलांचे, गरीबांचे सरकार आहे. मी घरी बसणारा नाही तर शेतात काम करणारा मुख्यमंत्री आहे. आदेश देऊन एसीत बसणारा मी नाही, तर मी एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीशी जोडलेला मुख्यमंत्री आहे.

Team Global News Marathi: