Sunday, August 7, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुकोबारायांचा सोहळा सोलापूर जिल्ह्यात,अकलूज मध्ये पार पडले गोल रिंगण, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 6, 2022
in महाराष्ट्र
0
तुकोबारायांचा सोहळा सोलापूर जिल्ह्यात,अकलूज मध्ये पार पडले गोल रिंगण, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित
ADVERTISEMENT

तुकोबारायांचा सोहळा सोलापूर जिल्ह्यात,अकलूज मध्ये पार पडले गोल रिंगण, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित

 

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

यांनी केले सोहळ्याचे स्वागत

ADVERTISEMENT

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीच्या वाटेवर निघालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (दि. ५ जुलै) सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पालखीचे स्वागत केले.

ADVERTISEMENT

नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी साडेआठ वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन करुन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे उपस्थित होते.

तत्पूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी परीट यांनी भक्तीमय वातावरणात पालखीला निरोप दिला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले पालखीचे सारथ्य

सराटी (ता. इंदापूर) येथून पालखी माळशिरस तालुक्यातील अकलूज हद्दीत आल्यानंतर पालखीचे स्वागत जिल्हा प्रशासनाने केले. पालखीच्या स्वागत ठिकाणापासून अकलूज येथील गांधी चौकापर्यंत पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी होते.

अकलूज नगरपरिषदेच्या वतीने स्वागत

अकलूज येथील गांधी चौकात नगरपरिषदेच्या वतीने आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. मुख्याधिकारी तथा प्रशासक दयानंद गोरे यांच्यासह अकलूज परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

पालखीचे जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात पार पडले. माने विद्यालयात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रथम पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग आणि टाळकरी यांचे रिंगण झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अश्व पूजन करून अश्व रिंगणात धावले. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरला. अश्वाचे रिंगणात धावणे हा क्षण टिपण्यासाठी प्रत्येकजण नजरा एकटक लावून बसला होता. लाखों वारकरी, ग्रामस्थ अश्वाचा नेत्रदीपक सोहळा पाहून तृप्त झाले.

या रिंगण सोहळ्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते, पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर आदी मान्यवर उपस्थित होते.

(फोटो : रविराज वाणी, उल्का फोटो स्टुडिओ, माळशिरस)

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अकलूजउभे रिंगणवारीसंत तुकाराम
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्र्यांचे ‘ठाकरे’ प्रेम अधोरेखित! एकनाथ शिंदे यांच्या घराच्या भिंतीवर…

Next Post

राशिभविष्य:जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Next Post
राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य:जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • भंडाऱ्याच्या ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करून पीडितेला न्याय द्या – मनीषा कायंदे.
  • महाराष्ट्रात रहायचं तर थोर महापुरुषांची नावे घ्यावीच लागतील, अन्यथा राज्याबाहेर हाकला – संभाजीराजे
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींब्यासाठी क्रांती दिनी शिवसेनेची क्रांती रॅली.
  • मिसेस अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं
  • “शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group