विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी मागच्या काही दिवसांपासून आंदोलन करत येन सणासुदीला कर्मचाऱ्यांनी पुराकारलेल्या आंदोलनामुळे प्रवेशनाचे मोठे हाल होताना दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकायला मिळत आहे. एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत.
अलीकडेच अहमदनगर येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर मालेगावात उच्चशिक्षण घेता येत नाही म्हणून कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. तुटपुंज्या पगारात एसटी कर्मचाऱ्यांना जीवन जगत आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी हताश झाल्याचं दिसून येते.
शेगाव इथं एसटीच्या मागील बाजून लटकून आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना ताजी असतानाच कळवण आगारातील एका एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं धक्का बसला आहे. कमी पगार त्यात आई-पत्नीवर उपचार कसे करायचे? दिवाळी सण असताना मुलांना कपडे कसे घेणार? या विचारातून या एसटी कर्मचाऱ्याने स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला पण सुदैवाने त्यांचा जीव वाचला.