दोन वर्षे असणारं कोविडचं सावट आणि त्यानंतर निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता, या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार आहे. साधारण काही महिन्यांपासून प्रत्येकजण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीला लागल्याचं दिसत आहे. सेलिब्रिटीही यात माहे नाहीत. यापूर्वी पडद्यामागून चालणारी सेलिब्रिटींची गणेशोउत्सवासाठी सुरु असणारी तयारी आता संपूर्ण जगासमोर आली आहे.
बरेच सेलिब्रिटीही या उत्साहात न्हाऊन निघाले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या कुटुंबाचाही यात समावेश आहे. प्रकरणी शिल्पाचा पती, राज कुंद्रा याच्यावर लावण्यात आलेले गंभीर आरोप असो किंवा मग त्यानंतर शिल्पालाही सहन करावा लागलेला मनस्ताप असो. या सेलिब्रिटी जोडीनं वाईटातले वाईट दिवसही पाहिले.
मुद्दा असा, की त्यातूनही पुढे येत त्यांनी विश्वासानं हे नातं टिकवून ठेवलं. संकटं दूर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा गणरायाच्या आगमनासाठी सज्जही झाले आहेत.नुकतंच राज कुंद्रा यानं गणपतीची मूर्ती घरी आणण्यासाठी गणेश चित्रशाखा गाठली. इथंही तो नेहमीप्रमाणेच तोंड लपवून आला. देवापुढे नतमस्तक होत त्यानं आपल्यावर कृपा ठेवण्यासाठी या ईष्ठदेवतेकडे प्रार्थना केली.