रावसाहेब दानवे यांच्याकडे ३ खाती आहेत, .मात्र ते बिनकामाचे मंत्री – रावसाहेब दानवे

 

भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेत भाजपा नेते आणि रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा उल्लेख देवाला सोडलेला वळू म्हणजेच सांड असा केल्याने आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. आता त्यांच्या या विधानाचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

मोदी सरकारमधील राज्यातील मंत्री जनआशीर्वाद यात्रेच्या नावाखाली विरोधी पक्षांना फक्त शिव्या देण्याचे काम करत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर येऊन टीका करणे हाच भारतीय जनता पक्षाचा एकमेव कार्यक्रम आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वापरलेली भाषा त्यांचा कुसंस्कृतपणा दाखवतो, असे प्रत्युत्तर देत मोदी सरकारने 7 वर्षात महागाई, बेरोज़गारी, गरिबी, जीडीपी, अर्थव्यवस्थेवर काय दिवे लावले ते जनतेला सांगा, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे
मोदी सरकारमध्ये नव्याने समावेश करण्यात आलेले राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडय़ात जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. शुक्रवारी ही यात्रा जालना जिल्हय़ात आली. यावेळी बदनापूर येथे आयोजित सभेत पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी यांचा “देवाला सोडलेला वळू” असा उल्लेख करत अतीशय हीं दर्जाची टीका केली होती.

Team Global News Marathi: