टीएमसीने हातवर करताच महुआ मोइत्रांकडून टीएमसीचं ट्विटर हँडल अनफॉलो

 

काली या डॉक्यूमेंट्रीच्या पोस्टरवरून सुरू झालेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या खासदार महुआ मोइत्रा यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर त्यानी एक वादग्रस्त विधान करून या प्रकरणाला अधिकच हवा दिली. त्यामुळे हा वाद अजून वाढला आहे.

माझ्यासाठी माँ कालीची अनेक रुपे आहेत. कालीचा अर्थ मद्य आणि मांसाचा स्वीकार करणारी देवी आहे. लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. मला त्याबाबतच काहीच अडचण नाही, असं मोइत्रा यांनी म्हटलं. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मोइत्रा यांच्या या विधानावरून तृणमूल काँग्रेसनेही हातवर केले आहेत. तर दुसरीकडे मोइत्रा यांनी टीएमसीचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे.

तृणमूल काँग्रेसने महुआ मोइत्रा यांना टॅग करून ट्विट केलं आहे. एका खासगी कार्यक्रमात महुआ मोइत्रा यांनी देवी कालीवर केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा पक्षाशी काहीच संबंध नाही. त्यांच्या व्यक्तिगत क्षमतेनुसार त्यांनी हे विधान केलं आहे. आम्ही त्या विधानाचं समर्थन करत नाही. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करत आहे, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर मोइत्रा यांनी टीएमसीचं ट्विटर अकाऊंट अनफॉलो केलं आहे.

Team Global News Marathi: