मागच्या काही दिवसांनपासून भाजपा अमर गोपीचंद पडळकर सतत पवार कुटुंबियांवर निशाणा साधलाय दिसून येत आहे आता या टीकेला पडळकरांचे राजकीय गुरु महादेवराज जाणकार यांनी पाडळकरांना सल्ला दिला आहे. टीका करण्यापूर्वी आपण आपली औकात बघून बोलले पाहिजे. पडळकर आता मोठ्या पक्षात आहेत, आमदार झाले आहेत आता त्यांना ही जाणीव येणे गरजेचे असल्याचे खडेबोल जानकर यांनी सुनावले आहे. पंढरपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा सल्ला दिला आहे.
तसेच शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीसंदर्भात बोलताना जाणकार म्हणाले की, पक्षाध्यक्षाचा पक्ष संघटना आणि आमदार खासदार यांचा संपर्क तुटला की, त्या पक्षाची अवस्था शिवसेनेसारखी होते असा टोला राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी लगावला. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा थेट संपर्क जनतेसोबत पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी असणे आवश्यक असते. तो संपर्क तुटल्यानेच शिवसेनेची ही अवस्था झाल्याचे जानकर यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले की, पक्षाच्या प्रमुखाचा आपल्या संघटना आणि लोकप्रतिनिधींशी संपर्क असणं गरजेचं आहे. नाही तर त्या पक्षाची अवस्था शिवसेना पक्षासारखी होते. नेता कितीही मोठा असला तरी त्याचा संपर्क थेट जनतेसोबत असणे आवश्यक असतो, असं जानकर म्हणाले.