Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे…

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 19, 2022
in देश विदेश
0
या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे…
ADVERTISEMENT

या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे…

खरे तर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे, हे धोक्याचे असते. पण, दर्जेदार स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फायदाही झाला आहे. आज आम्‍ही आपल्याला अशाच एका शेअर संदर्भात माहिती देत ​​आहोत. या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

या शेअरचे नाव आहे, कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation). हा या वर्षीच्या संभाव्य मल्टीबॅगर शेअर्सपैकी (Multibagger stocks) एक आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सनी (Kaiser Corporation share price) गेल्या एका वर्षात 19,981 टक्के एवढा परतावा दिला आहे.

ADVERTISEMENT

शेअर प्राइस हिस्ट्री – कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचा ​​शेअर 30 जून 2021 रोजी BSE वर केवळ 37 पैशांच्या पातळीवर होता. जो आता एका वर्षात 17 जून 2022 ला BSE वर वाढून 74.30 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 19,981.08 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे.

तर देल्या सहा महिन्यांचा विचार करता, हा शेअर 1.92 रुपयांवरून (20 डिसेंबर 2021 चा बीएसईवरील बंद भाव) 74.30 रुपयांवर पोहोचला आहे. या काळात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,790.05 टक्के परतावा दिला आहे.

ADVERTISEMENT

महत्वाचे म्हणजे, YTD मध्ये या शेअरने 2,444.52 टक्के एवढा जबरदस्त परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचा शेअर 2.92 रुपयांना होता. तर गेल्या पाच ट्रेडिंग सेशंसमध्ये तो 10 टक्क्यांनी वधारला आहे.

गुंतवणूकदारांना झाला 2 कोटी रुपयांचा फायदा – कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर प्राइसच्या पॅटर्ननुसार (Kaiser Corporation share price), जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये वर्षभरापूर्वी, 37 पैशांप्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर आज त्याचे तब्बल 2 कोटी रुपये झाले असते.

6 महिन्याचा विचार करता, या शेअरमधील 1 लाख रुपयांची गुंतवणूक सहा मिहिन्यांत 38.69 लाख रुपये झाली असती. या प्रकारे एखाद्या गुंतवणूकदाराने यावर्षी या शेअरमध्ये 2.92 रुपये प्रती शेअर प्रमाणे 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 25.44 लाख रुपये झाले असते.

काय करते कंपनी? – या कंपनीची स्थापना सप्टेंबर 1993 मध्ये मुंबई येथे झाली. यानंतर, 15 मार्च 1995 रोजी कंपनीचे रूपांतर कैसर प्रेस लिमिटेड नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. 5 नोव्हेंबर 2013 रोजी कंपनीचे नाव बदलून “कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड” असे करण्यात आले आहे.

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (केसीएल) लेबल, स्टेशनरी आर्टिकल्स, पत्रिका आणि कार्टनचा व्यवसाय करते. KCL आपल्या सहाय्यक कंपन्यांच्या माध्यमाने अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग आणि टर्नकी प्रकल्पांमध्येही काम करते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: पेनी स्टॉकशेअर बाजार
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना नावाचा 56 वर्षाचा झंझावात! कशी राहिली आहे शिवसेनेची संघर्षमय राजकीय वाटचाल? वाचा सविस्तर…

Next Post

सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाचे संरक्षण, केंद्र सरकारचा निर्णय

Next Post
सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाचे संरक्षण, केंद्र सरकारचा निर्णय

सदाभाऊ खोत यांना वाय दर्जाचे संरक्षण, केंद्र सरकारचा निर्णय

Recent Posts

  • ‘त्यांच्या’वर कारवाई होणारच, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावलं
  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group