Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वसामान्यासाठी उघडलेली ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती

by ग्लोबल न्युज नेटवर्क
June 23, 2022
in राजकारण
0
सर्वसामान्यासाठी उघडलेली ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती
ADVERTISEMENT

वर्षा बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद, पण… शिंदेंकरवी शिरसाटांचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

ही आहे आमदारांची भावना…; उद्धव ठाकरेंना उद्देशून लिहिलेलं पत्र एकनाथ शिंदेंनी केलं ट्विट

सर्वसामान्यासाठी उघडलेली ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

मुंबईः शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानं राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत आहेत. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे शिवसेनेचे 41 आणि अपक्ष 6 आमदार मिळून 47 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलंय. विशेष म्हणजे याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय.

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे ही आहे आमदारांची भावना… म्हणत एकनाथ शिंदेंनी ते पत्र ट्विटरवर ट्विट केलंय. काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती, अशी खंतही संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केलीय.

विशेष म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी ऑनलाईन संवाद साधत चेंडू एकनाथ शिंदेंकडेच टोलवला आहे. बाहेर राहून बोलण्यापेक्षा समोर येऊन मी मुख्यमंत्री नको असं सांगा. माझ्या ऐवजी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला मान्य आहे, अशी गुगली उद्धव ठाकरेंनी टाकली. त्यानंतर आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी ट्विटर करत उद्धव ठाकरेंना भावनिक साद घातलीय.

ADVERTISEMENT

ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022

जय शिरसाटांचं पत्र जसंच्या तसं

श्री. उध्दवजी ठाकरे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र.

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय

पत्रास कारण की…

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) वडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?

हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भूमिपूजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: एकनाथ शिंदेपत्र शिवसेनासंजय राऊतसंजय शिरसाठ
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार संजय शिरसाट यांचं खरमरीत पत्र

Next Post

मोठी बातमी | बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

Next Post
मोठी बातमी | बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

मोठी बातमी | बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची मुंबईत १२ ठिकाणी छापेमारी

Recent Posts

  • ‘त्यांच्या’वर कारवाई होणारच, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावलं
  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला
  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group