ऑक्सिजनची कमतरता नव्हती’, तर संवेदनशीलता आणि खरेपणाची मोठी कमतरता

 

नवी दिल्ली | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात उद्भवलेल्या परिस्थितीवरुन काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे देशात ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील कोरोना परिस्थिती भयानक झाली होती. या काळात केंद्राने चुकीचे निर्णय आणि उपाययोजना केल्या असल्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात होता. काँग्रेसने कोरोना काळात वारंवार मोदी सरकारचा पत्राद्वारे सुचना देण्याचाही प्रयत्न केला होता.

काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, सत्य हेच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारत सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे ५ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेकांची बहीण, भाऊ, आई-वडीलांचा समावेश आहे. अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

 

Team Global News Marathi: