दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक दुर्दैवी – संजय राऊत

दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांना दिली जाणारी वागणूक दुर्दैवी – संजय राऊत

राजधानी दिल्ली येथे शेतकरी कायद्या विरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. तसेच पंजाब आणि हरियाणा येथून आलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हणत असाल तर तुम्हाला देशात अस्थिरता निर्माण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केंद्र सरकारवर लावला आहे.

यावर पत्रकार माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, ज्या प्रकारे दिल्ली येथे शेतकऱ्यांना अडवण्यात आले आहे. जसे की इतर देशातून ते आलेले आहे. त्या शेतकऱ्यांना जी वागणूक दिली जात आहे जसे की, ते दहशतवादी असल्यासारखी वागणूक दिली जात आहे.

जसे पंजाब आणि हरियाणा येथून आलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानवादी असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. जर पंजाब आणि हरियाणा येथून आलेल्या प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही खलिस्तानवादी म्हणत असलात तर तुम्हाला देशात अस्थिरता माजवायची आहे असा आरोप राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर लगावला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: