Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….

by ग्लोबल न्युज नेटवर्क
May 20, 2023
in क्राईम
0

युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
शेतकरी आत्महत्या प्रमाणेच गंभीर सामजिक प्रश्न..
—–
मागील आठ दिवसात #बार्शी शहरात तीन युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील दोन युवकांनी एकाच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पाठोपाठ एक घडणाऱ्या या घटनांनी समस्त बार्शीकराना धक्का बसला आहे. मागील एक दिड वर्षातील आत्महत्येची फक्त बार्शी शहरातील आकडेवारी काढली तर याचे गांभीर्य लक्षात येण्या सारखे आहे.

#जगात जर वर्षी सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करतात. सन २०२० मधील आकडेवारी पाहता भारतात एक लाख ३५ हजार लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. जागतिक आकडेवारीच्या भारतातील प्रमाण तब्बल १७ % इतके आहे. तर देशातील एकूण आत्महत्यांचा विचार करता महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असून हे प्रमाण ११.९% इतके आहे.

#आत्महत्येसाठी बहुतांश वेळा क्षणिक कारणे कारणीभूत ठरत असतात असे यातील अभ्यासकांचे मत होते. तर काही केस मध्ये सतत सतावणारी समस्या असू शकते. या मध्ये मानसिक शारीरिक समस्या, नैराश्य, #कौटुंबिक समस्या, व्यसन, नातेसंबंधांच्या समस्या अशी अनेक कारणे आत्महत्येसाठी असू शकतात. देशात महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गाजला होता तेव्हा निसर्गाचा कोप, सतत ची नापिकी, अत्यल्प उत्पन्न, त्यातून वाढणारा कर्जाचा बोजा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे खाजगी सवकरकीचा आवळलेला फास अशी करणे पुढे आली होती.

अलीकडील काळात युवकांच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही आपल्या देश, राज्या समोर निर्माण झालेला मोठा सामाजिक प्रश्न आहे. युवकांच्या आत्महत्या मुळे केवळ ऐका परिवाराचे नव्हे तर देशाचे व संपूर्ण समजचे खूप मोठे नुकसान होत आहे. यासाठी सर्वांनीच युवकांच्या आत्महत्या या विषयाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. आजचा युवक असे टोकाचे पाऊल का उचलतो त्याच्या मनात नेमके काय सुरू आहे. त्यावर उपाययोजना काय कराव्या लागतील याची सामाजिक चर्चा घडून आणली पाहिजे. सरकारला या प्रश्नाकडे गांभीर्याने घेण्यास भाग पाडले पाहिजे.

अलीकडील काळात होणाऱ्या युवकांच्या आत्महत्या यास वेगवेगळी कारणे असू शकतात. (आम्ही इथे कोणा येकाचे उदाहरण देत नाहीत आणि कोणाचा अनादर करत नाहीत.) पण बदलती जीवनशैली आजच्या युवकांना मरणाच्या खाईत लोटत आहे. तंत्रज्ञांच्या वेगवान युगात प्रतेकाची जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. प्रत्येकाला वेगाने पुढे जायचे आहे. झटपट आपले धेय गाठायचे आहे. जर आपले धेय सध्या नाही झाले की प्रचंड नैराश्य आजच्या युवकांना येत आहे. त्यातून काही लोक टोकाचे पाऊल उचलतात.

तर काही या #तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल वरील जुगारात प्रचंड आहरी गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याने टोकाचे पाऊल उचलत आहेत. शासनाने तत्काळ जुगारी ॲपवर बंदी घातली पाहिजे. ही मागणी आम्ही एकट्याने करून उपयोग होणार नसून समजतून यासाठी मोठा आवाज पुढे आला पाहिजे. युवकांच्या आत्महत्या का होत आहेत व त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी मानसोपचार तज्ञ, मनसशास्त्राचे अभ्यासक, युवकांचे अभ्यासक यांनी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

या पोस्ट मार्फत आम्ही हेच सांगू इच्छितो की आत्महत्या हा संकतावरील उपाय नसून पळवाट आहे. संकट कितीही लहान – मोठे असले तरी शांतपणे विचार करणे आवश्यक आहे. आपल्या परिवारात आपल्यावर अवलंबून असलेले लोक कोण कोण आहेत आपल्या टोकाच्या पावलाने आपण त्यांचे जीवन अंधकारमय करतोय याचा विचार करणे आवश्यक आहे. आपल्यावर वरील चर्चा केल्या प्रमाणे काही संकटे असतील तर सर्वप्रथम आपण आहे ती परिस्थीती मान्य केली पाहिजे. आजच्या स्थितीत आपण कुठे आहोत आता यातून बाहेर निघण्यासाठी काय केले पाहिजे याचा विचार केला पाहिजे.

सर्वात महत्वाचे आपल्या मित्रा जवळ, विश्वासू व्यक्ती जवळ, पोलीस बांधवांनजवळ मन मोकळे केले पाहिजे. आपली समस्या सांगितली पाहिजे. या जगात अशी कोणतीच समस्या नाही की त्याच्यावर मार्ग निघू शकणार नाही. जरी आर्थिक संकटे असतील कोणा दादा, भाई, गुंड लोकाचे टेन्शन आले तरी जीवन संपवण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने संकटच संपवता येते हे लक्षात घेतले पाहिजे.
——–
आमच्या वाचकांना आवाहन….
जे कोणी मित्र आपल्या जवळ मनमोकळे करतील तेव्हा आपण त्यांचे सर्व ऐकून घ्या. त्यांचे बोलणे टिंगल टवाळी वर घेऊ नका. त्यांना धीर द्या. आपण समस्या सोडवू शकत नसाल तरी समोरच्या व्यक्तीला बळ नक्कीच देऊ शकतो.
———–

साभार सुदर्शन हांडे बार्शी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: बार्शीसुसाईड
ADVERTISEMENT
Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group