भोपाळ | सध्या संपूर्ण देशात करून संसर्गाने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना सर्गांला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. मात्र आद्यपही अनेकांमध्ये लसीसंदर्भात गैरसमज असल्यामुळे लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लस न घेण्यासाठी योग्य कारण न देणाऱ्या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन सक्सेना यांनी याबाबत सांगितले की, शिक्षकांचे लसीकरण करण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. भोपाळ जिल्ह्यात एकूण १७ सेंटर उघडण्यात आली आहेत.
आतापर्यंत ९२ शिक्षक असे आहेत ज्यांनी पहिला डोस घेतलेला नाही. सहा दिवसांच्या आत लस न घेण्यामागचे योग्य कारण न दिल्यास या शिक्षकांचे एका महिन्याचे वेतन कापले जाईल. राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे.
शिक्षक काँग्रेसचे प्रांतीय अध्यक्ष सुभाष सक्सेना यांनी सांगितले की भोपाळ जिल्ह्यामध्ये सुमारे एक हजार शिक्षक असे आहेत. ज्यांचे आतापर्यंत लसीकरण झालेले नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये भोपाळ जिल्हा सर्वात लहान आहे. राज्यात सुमारे ३० ते ४० हजार शिक्षकांना अद्यापही लसीचा पहिला डोस मिळालेला नाही. आता कॅम्पच्या माध्यमातून शिक्षकांचे लसीकरण करण्याची तयारी केली जाणार आहे.