सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये अमित शाह यांचा समवेत जाणून घ्या इतर नेत्यांची नावे !

 

नवी दिल्ली | काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्री मंडळाचा विस्तार करून या नव्या मंत्री मंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. यात ४३ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. यासह मोदी सरकारमधील मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे. यामध्ये बरेच नवीन चेहरे समाविष्ट केले गेले आणि काहींना घराचा रस्ता दाखवला आहे.

मोदी यांच्या मंत्री मंडळातील ७० टक्के मंत्री कोट्याधीश आहेत. सदर जाहीर करण्यात आलेली मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मालमत्तेचा तपशील देण्यात आला आहे.

तसेच देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची एकूण मालमत्ता ५ कोटींपेक्षा जास्त आहे. त्या पाठोपाठ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा क्रमांक लागतो.

Team Global News Marathi: