राष्ट्रपती महोदय आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘काळा स्वातंत्र्य दिन’ पाळला, त्याचा निषेध का करत नाही?

राष्ट्रपती महोदय आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ रोजी ‘काळा स्वातंत्र्य दिन’ पाळला, त्याचा निषेध का करत नाही?

ग्लोबल न्यूज: राष्ट्रपती महोदय, ज्या आरएसएसने तुम्हाला राष्ट्रपती केले, त्याच आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ रोजी काळा स्वातंत्र्य दिन पाळला, त्याचा निषेध का करत नाही? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्र्पती महोदयांना विचारला आहे.

केंद्राने पारित केलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱयांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर रैलीला हिंसक वळण लागले होते. तसेच काही शेतकऱ्यांनी लाल किल्यावर निशाण साहेब आणि संघटनेचा झेंडा फडकवला होता. यावर राष्ट्रपतींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरूनच प्रकाश आंबेडकरांनी सवाल केला आहे.

राष्ट्रपती कोविंद यांना सवाल करताना प्रकाश आंबेडकर यांनी इतिहासाचा दाखला दिला आहे. राष्ट्रपती महोदय, मोठ्या खेदाने आणि दुःखाने तुम्हाला आठवण देणे जरूरी आहे की, ज्या आरएसएसने तुम्हाला राष्ट्रपती केले, त्या आरएसएसला १९४९ मध्ये आम्ही तिरंग्याचा अपमान करणार नाही आणि येणाऱ्या २६ जानेवारी व १५ ऑगस्टला आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकवू असे लिहून द्यावे लागले होते, अशी आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली आहे.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणतात की, आरएसएसने तिरंगा तर फडकवला, परंतु त्याच उंचीवर, समानस्तरावर स्वतःचा झेंडाही फडकवून आपली नियत दाखवून दिली होती. तुम्हाला याचा विसर पडला आहे का? शेतकरी आंदोलनाने तिरंगा खाली उतरवला नाही तर तिरंग्याच्या खाली १५ फूट खाली शीख धर्म आणि शेतकऱ्यांचा झेंडा लावला. याच्यात अपमान कुठे झाला? जर तुम्हाला हा अपमान वाटत असेल तर आरएसएसने १५ ऑगस्ट १९४७ रोजी काळा स्वातंत्र्य दिन पाळला होता. याची आठवण करून दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: