ओसाड जमीन खोदताना भांडे खणखणले; तब्बल 5 किलो सोन्याचे दागिने सापडले

 

सोन्याचा खजिना कोणाला नको आहे. परंतु समाजात असे काही नशीबवान लोक आहेत की त्यांचे नशीब फळफळते. त्यांच्यासाठी नशिबाची दारे उघडली जातात. असेच नशीब उजडले.

तेलंगणा राज्यातील जनगाव जिल्ह्यातील पेमबर्थी गावांमध्ये एका शेतकऱ्याला सोन्याचे मोठे घबाड सापडले आहे. (A farmer from Pembarthi in Jangaon district from Telangana discovered a pot filled with gold on Thursday.)

गुरुवारी हा शेतकरी एका ओसाड जमिनीच्या सपाटीकरणाचे काम करत असताना मातीतून सोन्याचे दागिने पडू लागल्याचा प्रकार घडला.त्याने एखाद्या भांड्याला काहीतरी मारण्याचा आवाज ऐकला.जेव्हा त्याने आवाजाच्या दिशेने शोध केला तेव्हा त्याला सोन्याने भरलेले भांडे सापडले.

शेतकरी नरसिंह याला जवळपास 5 किलो सोन्याचे करोडोंमध्ये किंमत असलेले ऐतिहासिक दागिने सापडले आहेत.

याची सोन्याच्या बाजार भावाप्रमाणे किंमत 2 कोटी आहे. परंतू अँटीक वस्तूंच्या बाजारात याची किंमत न सांगता येण्यासारखी आहे.म्हणजेच अनमोल आहे.

नरसिंह याला सोन्याचा घडा मिळाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर देखील याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर हा घडा पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी याठिकाणी झाली.

 

नरसिंह यांने एक महिन्यापूर्वीच ही 11 एकर जमीन खरेदी केली होती. ती जमीन शेतीयोग्य बनविण्यासाठी लेव्हलिंगचे काम सुरु होते.हा खजिना काकतीय साम्राज्याच्या वेळेचा असल्याचे सांगितले जात आहे.

काकतीय साम्राज्याची राजधानी वारंगल होती. जनगाव हा भाग देखील आधी वारंगलचा भाग होते. काही वर्षांपूर्वीच आता वेगळा जिल्हा बनविण्यात आला आहे.

आता हा खजिना ऐतिहासिक निघाला तर नरसिंह या शेतकऱ्याला त्याच्या एकूण किंमतीचा काही भाग बक्षीस म्हणून मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास त्याचा जमीन खरेदीचा खर्च वसूल होणार आहे.

याची माहिती प्रशासनाला मिळताच पोलिसांसह महसूलचे अधिकारीही दाखल झाले. त्यांनी हे सोने ताब्यात घेऊन निरिक्षणासाठी पाठविले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: