स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हे सर्वप्रथम २०१७ मध्ये आयोजित करण्यात आले होतं. यावेळी ४२,००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर दुसऱ्यावर्षी म्हणजेच २०१८ मध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही १ लाखांवर पोहोचली होती. त्यानंतर २०१९ साली विद्यार्थ्यांची संख्या वाढून २ लाखांवर पोहोचली होती. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन २०२० च्या पहिल्या फेरीत ४.५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सॉफ्टवेअर एडिशन्सचा भव्य समारोप समारोह यावर्षी ऑनलाईन आयोजित केला आहे. त्यासाठी देशभरातील सर्व सहभागींना विशेष तयार केलेल्या आधुनिक व्यासपीठावर एकत्र आणण्यात आले आहे.

देशाचे नवीन शैक्षणिक धोरण काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. २१व्या शतकातील तरुणांची मते, गरजा आणि आशा-अपेक्षा लक्षात घेऊन हे शैक्षणिक धोरन तयार केले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन साधने निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन सारख्या मोहिम, भारतातील शिक्षणाला अधिक आधुनिक बनावं आणि येथे प्रतिभेला पूर्ण संधी देण्याची पूर्ण संधी मिळायला हवी.
तरुणांच्या कलेला संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्हाला अभिमान आहे की, गेल्या शतकात आम्ही जगातील एकापेक्षा अधिक उत्कृष्ट वैज्ञानिक, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ, तंत्रज्ञान, उद्योजक दिले आहे.
मुले आणि महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात एखादी अलर्ट प्रणाली विकसित केली जाऊ शकते का? ही स्कूल बस, ऑटो, टॅक्सी यांना पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडली जाऊ शकते?
देशाच्या विकासात तरुणांचे मोठे योगदान
गावांना मोठ्या रुग्णालयांसोबत जोडण्याचे काम सुरू आहे. माझा विश्वास आहे की, आपण सर्वजण त्यात बरेच मूल्य जोडाल. तुम्ही या सर्व कामाला गती देऊ शकता.
जर आपण पूर नियंत्रणासाठी कोणतेही तंत्र विकसित केले तर ते एक मोठे यश असेल
कोरोनाच्या संकटात स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२० चे आयोजन ही एक मोठी गोष्ट आहे.
पंचायत ते कॉलेजच्या सुविधा पुरवण्यावर भर
स्मार्ट हॅकेथॉन २०२०च्या अंतिम फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांसोबत साधत आहेत संवाद