दिव्यांग मुलाच्या मदतीला वर्दीतील देवमाणूस आला धावून, होत आहे वायरल व्हिडिओची चर्चा

 

सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोलिसांवर मोठा प्रचंड ताण निर्माण झालेला दिसून येत आहे. मात्र अशा स्थितीतही शहरातील कायदा आणि सुवस्थेसाठी पोलीस २४ तास आपली ड्युटी निभावताना दिसून येत आहे. मात्र अशातच आता एका पोलीस कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तसेच लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या पोलिसानं रस्त्याच्या कडेला मक्याचं कणीस विकणाऱ्या दिव्यांगाला केलेली मदत पाहून नेटकरीही भावुक  झाले आहेत आणि पोलिसाचं कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये एक दिव्यांग मुलगा रस्त्याच्या कडेला बसून मक्याचं कणीस विकत होता. इतक्यात एका पोलिसाचं लक्ष या मुलाकडे गेलं. पोलिसाला या मुलाची परिस्थिती पाहावली नाही आणि त्यांनी त्याच्याकडील सगळी कणसं विकत घेतली.  आज वर्दीत काम करणाऱ्या या देवमाणसाला पाहून नेटकऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे.

 

सदर व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुद्धा रमेन यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शनही दिलं आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ४५ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे तर २ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोक या पोलिसाचं भरभरुन कौतुक करत आहेत. सध्या सर्वत्र याच व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.

Team Global News Marathi: