अख्खं तिरूपती शहर पाण्याखाली तिरुपती, तिरुमलात मुसळधार; सप्तगिरीचा घाटरस्ता बंद
तिरुपती, 19 नोव्हेंबर : देशातील सर्वाधिक श्रीमंत तिर्थक्षेत्र अशी ओळख असलेल्या तिरुमला तिरुपतीमध्ये (Tirumala Tirupati) मुसळधार पावसाने (Heavy Rain) कहर केला आहे. यामुळे तेथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तिरुमालाच्या रस्त्यांसह तिरुपतीतील अनेक भाग जलमय झाले आहेत.
तर मुख्य मंदिराच्या बाहेरील भागासह आणि दर्शन रांगेचा परिसर पाण्याखाली गेला आहे. अनेक ठिकाणी भाविक अडकले आहेत. मंदीराच्या सभोवताली असलेल्या डोंगरामधून येणारा पाण्याचा प्रवाह अभूतपूर्व असून गेल्या पन्नास वर्षांत पहिल्यांदाच अशी परिस्थिती उदभवली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हवेच्या बुडबुड्यात बदलल्याने चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.
Tirumala queue lines r flooded.. #TirupatiRains pic.twitter.com/1i8ps9fea8
— chaithu (@6eChaithu) November 18, 2021
तिरुमला घाटातील दोन घाट रस्ते भूस्खलनामुळे अधिकाऱ्यांनी बंद केले. 18 तारखेपर्यंत पदपथ खुला होणार नाही. तिरुमला येथील मोबाईल नेटवर्क सेवाही विस्कळीत झाली.
तिरुपतीमध्ये आज पुराच्या धोक्याची कमाल पातळी जाहीर करण्यात आली आहे. तिरुपती शहरात पुराच्या पाण्यात काही अंतरावर वाहनेही वाहून गेली. शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पुराचे पाणी साचले आहे.
#Tirumala 2nd turning ghat road situation 🙄 #TirupatiRains #Floods pic.twitter.com/I5tvGGHlTa
— Hari OM (@ajayhari444) November 18, 2021
तिरुपतीहून तिरुमला मंदीराकडे जाणा-या घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी पूर्ण मार्ग पाण्याखाली गेला आहे. तिरुमलाच्या येथील अतिवृष्टीमुळे मंदिराच्या मुख्य कार्यालयातही पावसाचे पाणी पोहोचले. नारायणगिरी गेस्ट हाऊसमधील तीन खोल्या भूस्खलनामुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत.
चित्तूर जिल्ह्यातील तिरुपती येथे पावसाने हाहा:कार माजवला आहे. शहरात अनेक भागात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. तिरुपती आणि तिरुमला येथे पाण्याची पातळी वाढली आहे. यात मधुरा नगर, गोलावनी गुंटा, लक्ष्मीपुरम, एअर बायपास, चंद्रगिरी आणि कपिला थिरथम मंदिर येते पाणी साचले आहे. तिरुमला पर्वतरांगातून पाणी वाहत असल्याने मंदिर परिसरातील रस्ते जलमय झाले आहेत. हजारो भाविक अडकले असून दुचाकी वाहने आणि ऑटोरिक्षा पाण्यात गेल्या. झाडेही पडली आहेत.
Andhra Pradesh: Heavy rainfall leads to inundation of roads in Tirupati
CM YS Jagan Mohan Reddy has directed the authorities to be vigilant and take necessary measures in wake of the inclement weather. pic.twitter.com/4h6tdgv6Ro
— ANI (@ANI) November 18, 2021
मुसळधार पावसामुळे दुपारपासून सप्तगिरी पर्वताची वाहतूक थांबवली. तिरुमला येथे रेस्ट हाऊस भागात पाणी असल्याने भाविकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी नेल्लोर, चित्तूर आणि कड्डपाच्या विभागीय आयुक्तांशी संपर्क साधून स्थिती जाणून घेतली आहे. तिरुपती शहरातील काही भागात घरात पाणी शिरले आहे. चंद्रगिरी भागातही पाणी वाढले आहे. नेल्लूर शहरातील सखल भागात पाणी साचले आहे.
कडप्पा जिल्ह्यातही अनेक भागात पाणी साचले असून गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.पावसाचा फटका…तिरुमला येथील जपाली अंजनेय स्वामी मंदिर पाण्याखालीमुख्य मंदिराकडे जाणाऱ्या चारही मार्गावर पाणीतिरुपती देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सुटीमंदिराकडे जाणारे घाटातील दोन्ही मार्ग बंदनारायणगिरी रेस्ट हाउसच्या तीन खोल्यांचे नुकसान झाले आहे.