बाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कट नव्हता, सर्व आरोपींची निर्दोष सुटका

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह ३२ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लखनऊ: बाबरी विध्वंस प्रकरणी सीबीआयने कोर्टाने आपला निकाल सुनावला आहे. याप्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टाने सर्व ३२ आरोपींनी निर्दोष ठरवलं आहे. सीबीआयला सबळ पुरावे कोर्टात सादर करता आलेले नाही. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. जवळजवळ २८ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे.

दरम्यान, कोर्टाच्या निर्णयामुळे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्यात लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती यांच्यासह ३२ लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, प्रकृतीत ठीक नसल्याने लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती या कोर्टात हजर राहू शकले नव्हते. या खटल्यात एकूण ४९ जण हे आरोपी होते. ज्यापैकी १७ जणांचे निधन झाले आहे. तर आता ३२ जण निर्दोष ठरले आहेत. 

बाबरी मशीद: सुनियोजित कट नव्हता, सर्व आरोपींची निर्दोष सुटका

राजकारण ते कोर्टाचा निकाल

बाबरी विध्वंस प्रकरणात बरेच राजकारण झाले आहे. कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांचा असं मानणं आहे की, यूपीच्या तत्कालीन भाजपा सरकारने तसेच भाजपा नेत्यांनी चिथावणीखोर भाषण दिले नसते तर ही घटना घडली नसती. परंतु सीबीआयला आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर करता आलेले नाही. त्यामुळे आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली.  

पाहा कोर्टाने आपल्या निकालात नेमकं काय म्हटलं आहे:

सर्व ३२ आरोपींची कोर्टाकडून निर्दोष सुटका

 अशोक सिंघल यांनी लोकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना थेट दगडफेक सुरु केली 

तिथे उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी कारसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला.

सीबीआय प्रबळ साक्षीदार सादर करु शकले नाही. 

बाबरी मशीद प्रकरणी प्रबळ साक्षीदार नव्हते 

बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता: कोर्ट

बाबरी मशीद प्रकरण: न्यायाधीश कोर्टरुममध्ये पोहचले, निकाल वाचनास सुरुवात 

अडवाणी, जोशी यांच्यासह एकूण सहा आरोपींना न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यातून सूट देण्यात आली आहे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते न्यायालयीन कामकाजात सहभागी होतील.

 साध्वी ऋतंभरा, चंपत राय, साक्षी महाराज, ओम प्रकाश पांडेय, जय भगवान गोयल, आचार्य धर्मेंद्र देव, राम जी गुप्ता हे कोर्टात हजर आहेत.

सीबीआयचे विशेष न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने कोर्ट परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

निकालाच्या काही वेळापूर्वी काही आरोपींनी असे म्हटले होते की, न्यायालय जो काही निर्णय देईल त्याचे स्वागत करु.

एक-एक आरोपी सीबीआयच्या विशेष कोर्टाच्या कक्षात दाखल होत आहेत आणि न्यायाधीश एस.के. यादव आधीपासूनच हजर आहेत

वादग्रस्त बांधकाम ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडलं गेलं

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी बाबरी मशिदीचं वादग्रस्त बांधकाम उद्धवस्त प्रकरणी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह यांच्यासह ४९ आरोपी होते. ज्यापैकी १७ जणांचं निधन झालं आहे. सीबीआय कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी १ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली होती आणि 2 सप्टेंबरपासून निकाल लिहिण्याचे काम सुरू झाले होते.

बाबरी मशीद प्रकरणी कोर्टात गेले अनेक वर्ष जो खटला सुरु होता त्या प्रकरणाचा आज (३० सप्टेंबर) निकाल सीबीआयच्या विशेष कोर्टाने सुनावला आहे. पाहा कोर्टाने आपल्या निकालादरम्यान काय म्हटलं आहे. कोर्टाने निकाल सुनावताना सुरुवातीला काही निरिक्षणं नोंदवली.

यावेळी कोर्टानं स्पष्ट केलं की, ‘बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता. सीबीआयला याप्रकरणी सबळ पुरावे किंवा साक्षीदार कोर्टासमोर सादर करता आलेले नाही. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या अशोक सिंघल यांनी जमलेल्या जमावाला थांबविण्याचा प्रयत्न केला. पण कारसेवकांनी थेट दगडफेक सुरु केली. याशिवाय तिथे उपस्थित असणाऱ्या नेत्यांनी कारसेवकांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व ३२ आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे.’

ग्लोबल न्युज नेटवर्क: