उद्योगपतींकडून मिळणाऱ्या देणगीत भाजपा अव्वल स्थानी दुसऱ्या क्रमांकावर हा पक्ष

उद्योगपतींकडून मिळणाऱ्या देणगीत भाजपा अव्वल स्थानी दुसऱ्या क्रमांकावर हा पक्ष

राजकीय पक्षांना बड्या उद्योगपतींकडून देणगी मिळताच असते यावर आनेकवेळा वाद विवाद झालेले आहेत. आता एडीआरने अर्थात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस यांनी गुरुवारी आपला वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार २०१८-१९ या कालवधीत कॉर्पोरेट कंपन्या आणि विविध बडे उद्योगपतींकडून देशातील राजकीय पक्षांना ८७६ कोटी इतक्या रुपयाची देणगी देण्यात आल्याची माहिती अहवालतुन समोर आलेली आहे.

या देणगीनमध्ये प्रथमस्थानी केंद्राच्या सत्तेत असलेला भारतीय जनता पक्षाचा क्रमांक लावून दुसऱ्या स्थानीं देणगी मिळवण्यात काँग्रेस पक्षाचा क्रमांक लागतो असा दावा एनडीआरच्या अहवालातुन करण्यात आलेला आहे.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भाजपला उद्योगपतींकडून ६९८ कोटींची देणगी मिळाली. तर कॉंग्रेसला एकूण १२२.५ कोटी रुपये मिळाले आणि या यादीत काँग्रेस दुसर्‍या स्थानावर आहे, असा दावा एडीआर अहवालात केला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारावर एडीआर आणखी माहिती दिलीय. सर्व राजकीय पक्षांनी देणगीदार आणि देणग्यांची माहिती द्यावी. या देणग्या आर्थिक वर्षात २०,००० रुपयांपेक्षा अधिक असल्यास तपशील जाहीर करणं आवश्यक आहे.

घटस्थापना कशी करावी.? जाणून घ्या : नवरात्र उत्सव पूजा विधी आणि शुभ मुहूर्त.!

ग्लोबल न्युज नेटवर्क: