TATA GROUP भारतात मेक इन इंडिया चा ट्रेड पण टाटा ग्रुप ब्रिटन मध्ये उभारणारा 425 अब्ज रुपयांची फॅक्टरी

नवी दिल्ली: सध्याच्या घडीला भारत सरकार आणि पंतप्रधान मोदी मेक इन इंडियावर भर देत आहेत. आकर्षक बाजारपेठ आणि उद्योगासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे जगाच्या नजरा भारताकडे वळल्या आहेत. ज्या कंपन्या पूर्वी चीनमध्ये त्यांचे प्रकल्प उभारत असत त्या आता भारतात येत आहेत. दरम्यान, या ट्रेंड उलट एक वेगळीच बातमी समोर आली आहे. भारतातील टाटा समूह ब्रिटनमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. २३० अब्ज डॉलर्सच्या टाटा समूहाने बुधवारी युकेमध्ये बॅटरी सेल गीगाफॅक्टरी स्थापन करण्याची घोषणा केली.

यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये आतापर्यंत आलेल्या ऑटो क्षेत्रातील ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. त्याच वेळी, टाटा समूह १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून भारतात बॅटरी प्लांट उभारण्याचा विचार करत आहे.

किती होणार वार्षिक उत्पादन

टाटा सन्सने यूकेमध्ये जागतिक बॅटरी सेल गीगाफॅक्टरी उभारण्याची आपली योजना जाहीर केली आहे. यामुळे यूकेमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धात्मक ग्रीन टेक इकोसिस्टम तयार होईल. यासाठी ४ अब्ज पौंड (४२५ अब्ज रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. हा टाटा कारखाना वार्षिक 40 GW सेल तयार करेल.
इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि रिन्यूएबल एनर्जी स्टोरेज सोल्यूशन्ससाठी टाटा समूहाच्या वचनबद्धतेचा हा एक भाग आहे.

टाटाच्या अनेक कंपन्या यूकेमध्ये कार्यरत.

टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, समूहाच्या अनेक कंपन्या यूकेमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, ‘टाटा समूह यूकेमध्ये युरोपमधील सर्वात मोठ्या बॅटरी सेल निर्मिती प्रकल्पाची स्थापना करणार आहे. समूहाची अब्जावधी पौंड गुंतवणूक यूकेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणेल. यामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्राला इलेक्ट्रिक मोबिलिटीकडे नेण्यास मदत होईल. या धोरणात्मक गुंतवणुकीसह, टाटा समूह यूकेशी आपली बांधिलकी आणखी मजबूत करत आहे. आमच्या अनेक कंपन्या येथे तंत्रज्ञान, ग्राहक, हॉस्पिटीलिटी, स्टील, रसायने आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रात काम करत आहेत.

हजारो नोकऱ्या मिळतील

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सांगितले की, टाटाची गीगाफॅक्टरी ही ब्रिटनमधील वाहन क्षेत्रात आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. सुनक म्हणाले, “टाटा समूहाचा यूकेमध्ये बॅटरी सेल गीगाफॅक्टरी स्थापन करण्याचा निर्णय भारताबाहेरील यूकेवर असलेला त्यांचा प्रचंड विश्वास दर्शवतो. यामुळे यूकेमध्ये हजारो नोकऱ्या निर्माण होतीलच, शिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या जागतिक संक्रमणामध्ये आमचे नेतृत्व बळकट होईल. यामुळे भविष्यात उद्योगांमध्ये आपली अर्थव्यवस्था वाढण्यास मदत होईल.

Team Global: