Thursday, April 25, 2024

Tag: टोल

टोल प्लाझा बंद होणार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती

टोल प्लाझा बंद होणार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती

टोल प्लाझा बंद होणार, रांगा घटवण्यासाठी सॅटेलाइट आधारित टोल आणणार, गडकरींची माहिती नवी दिल्ली : केंद्र सरकार टोल प्लाझा बदलण्यासाठी नव्या ...

रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार

रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार

रोखीने पथकर देणाऱ्यांकडून दुप्पट पथकर आकारला जाणार प्रकल्प संचालक- संजय कदम यांची माहिती   सोलापूर – फास्टॅग नसलेल्या वाहनांनी पथकरनाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडूनदुप्पट पथकर आकारला जाईल. उद्या दि. 14 जानेवारी पासूनरोख रकमेव्दारे पथकर स्विकारण्यासाठी एकच लेन उपलब्धकरुन देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचेप्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली. त्याच बरोबर रोखीनेपथकर देणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकराची आकारणीकेली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.               श्री. संजय कदम यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे माहितीदिली आहे की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाव्दारेदेशभरातील सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीव्दारेपथकर स्विकारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी गाडीवरफास्टॅग लावणे बंधनकारक आहे. यापूर्वी यासाठी 15 डिसेंबर2019 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र ती वाढवून 14जानेवारी 2020 पर्यंत करण्यात आली.रोखीने पथकरस्विकारण्यासाठी पथकर नाक्यावर एकच लेन ठेवण्यात येणारआहे.               फास्टॅग साठी आवश्यक कागदपत्रे:- वाहनाचेरजिस्ट्रेशन सर्टिफिकेट,  वाहनधारकाचे पासपोर्ट आकाराचेफोटो,  केवायसीसाठी लागणारे कागदपत्रे (ड्रायव्हिंग लायसन्स,पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड  आणि पासपोर्ट)               सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात खालील ठिकाणीफास्टॅग उपलब्ध आहेत :- पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक65 वरील  सावळेश्वर, वरवडे जिल्हा सोलापूर येथील पथकरनाक्यावर, सोलापूर औरंगाबाद   राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52वरील  तामलवाडी, येडशी व पारगांव जिल्हा उस्मानाबाद येथीलपथकर नाक्यावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. वाहनधारकांना My FASTag ॲपव्दारे फास्टॅग उपलब्ध करुनघेता येतील. एसबीआय,आयसीआयसीआय, एचडीएफसी,ॲक्सीस व इंडस्  या बॅकेत विहित केलेल्या प्रक्रियेनुसार फास्टॅगउपलब्ध करुन घ्यावेत. तसेच ॲमेझॉन, पेटीएम ऑनलाईनसंकेतस्थळावर फास्टॅग उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहितीराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनीदिली.