Wednesday, April 24, 2024

Tag: अंकिता पाटील

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला पाटील यांच्या मुलीचे सडेतोड उत्तर

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला अंकिता पाटील यांचे सडेतोड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यात युवक काँग्रेस अध्यक्ष तथा युवा नेते सत्यजित तांबे यांनी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली होती. हर्षवर्धन पाटील संधीसाधू असल्याचा घणाघात तांबेंनी केली. तांबेंच्या टीकेला हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सत्यजीत तांबेंची कुवत सगळ्या राज्याला माहिती आहे. लहान तोंडी मोठा घास त्यांनी घेऊ नये. ज्येष्ठ नेत्याबद्दल बोलताना मान ठेवायला हवा. तसंच दिशाभूल करणारी वक्तव्यं त्यांनी टाळावीत”, अशा शब्दात शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जशास तसं प्रत्युत्तर दिले आहे. “युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तांबेंची निवड करण्यात हर्षवर्धन पाटील यांचा मोठा वाटा आहे. तांबेंचं वय हे भाऊंच्या राजकीय कारकीर्दीएवढंही नाही. तेव्हा टिकाटिप्पणी करण्यापूर्वी सत्यजीत तांबेंनी वयाची जाणीव तरी ठेवायला हवी होती”, असा बोचरा वार अंकिता पाटील यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटील संधीसाधू या टीकेला अंकिता पाटील यांचे सडेतोड उत्तर विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ...

अंकिता हर्षवर्धन पाटलांचा विक्रमी मतांनी पुणे झेडपीत प्रवेश

अंकिता हर्षवर्धन पाटलांचा विक्रमी मतांनी पुणे झेडपीत प्रवेश

इंदापूर : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत बहुमताने ...