भाजपा मंत्र्यांचं अजब विधान , लसीकरण झाल्यावर प्रत्येकांनी ५०० रुपयाची पंतप्रधान निधीत मदत करावी

मध्यप्रेदश | सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आज कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. देशात कित्येकांचा वेळेवर ऑक्सिजन, बेड आणि उपचार न मिळाल्याने मृत्यु झाला. कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरणावर भर देण्याचा निर्णय घेतला होता तसेच लसीकरण मोफत देण्याची घोषणा केली होती. मात्र अशातच मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी लसीकरणाबाबत अजब वक्तव्य केलं आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदत निधीत प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन उषा ठाकूर यांनी केलं आहे. त्या एका पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

आपल्याला माहितच आहे की एका डोसची किंमत २५० रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून कोरोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ५०० रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती असल्याचं उषा ठाकूर म्हणाल्या. यापूर्वी सुद्धा उषा ठाकूर यांनी कोरोना संदर्भात वादग्रस्त विधान केले होते.

Team Global News Marathi: