Thursday, May 26, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 26, 2022
in महाराष्ट्र
0
एसटी कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा ! कोणाचीही नोकरी जाणार नाही
ADVERTISEMENT

मुंबई । संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्चपर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे,असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दोन्ही सभागृहात केले.तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती व अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत.यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता १२ टक्क्यावरून २८ टक्के करण्यात आला, घरभाडे भत्ता ७ टक्के, १४ टक्के २१ टक्क्यावरून ८ टक्के,१६ टक्के आणि २४ टक्के करण्यात आला तसेच कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सेवाकालावधीनुसार रुपये ५०००, रुपये ४००० व रुपये २५०० अशी वाढ करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये साधारणत: रुपये ७००० ते ९००० रुपये वाढ झाली आहे व महामंडळावर दरमहा रुपये ६३ कोटीपेक्षा जादा भार पडला आहे.

 

ADVERTISEMENT

ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास आहे. त्यांच्या नोकरीची हमी आणि त्यांचा पगार महिन्याच्या १० तारखेच्या आत देण्याची राज्य सरकारने घेतली असल्याची माहितीही मंत्री परब यांनी सभागृहाला दिली.संप काळात एसटी महामंडळाला कोणतेही उत्पनाचे साधन नसताना कर्मचाऱ्यांना २५०० ते ५००० रुपये दिवाळी भेट म्हणून दिले. यामुळे महामंडळावर सुमारे २४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला, असेही त्यांनी सांगितले.

कृती समिती संघटनेने केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्या असतानाही कर्मचारी संपावर ठाम राहिले. हे कामगार वेगवेळया आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच कामगारांच्या भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्यास कोणीही बंदी घातलेली नाही. त्यांच्यावरील निलंबन, बडतर्फी, सेवासमाप्ती या सारख्या कारवाया आम्ही मागे घेतल्या आहेत. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे पुन्हा एकदा आवाहन परब यांनी केले.

ADVERTISEMENT

 

संपामुळे जेष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. अशा विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री परब यांनी दिली. एसटी संपाबाबत मंत्री ॲड. परब यांनी केलेल्या निवेदनावर विधान परिषद सदस्य जयंत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे आवाहन केले.

● दिनांक ८ नोव्हेंबर, २०२१ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामंडळातील “कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावे”, या बाबीसाठी सर्वांकश विचार करुन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसह अहवाल सादर करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आली.

● सदर तीन सदस्यीय समितीने महामंडळाच्या विविध २३ संघटनांच्या प्रतिनिधींचे व महामंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन आपला अहवाल दि. २५ फेब्रुवारी, २०२२ रोजी न्यायालयात सादर केला.

● समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने राज्य शासनाने महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांचा वेतनाची हमी घेतली आहे व त्यापोटी शासनाला वार्षिक सुमारे ४३२० कोटी रुपयांचा भार सहन करावा लागणार आहे.

●कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये अनेकांचे प्राण गेलेले आहेत.महामंडळातील ३०८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शासन निकषामध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५० लाखाची मदत महामंडळाने केली असून इतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये ५ लाखाची मदत महामंडळाने केली आहे.

● मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा रुपये १० लाखाची आर्थिक मदत देण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अनिल परबएसटी संपमाघारहजार
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Next Post

दिशा सालियनच्या आईवडिलांचे राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

Next Post
दिशा सालियनच्या आईवडिलांचे राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

दिशा सालियनच्या आईवडिलांचे राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ही मागणी

Recent Posts

  • ‘तू आणि मी, मी आणि तू’ सिनेमाचे पोस्टर रुपाली चाकणकरांच्या हस्ते झाले रिलीज
  • मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मंत्रालयातील वीज पुरवठा खंडित, कॉम्पुटरसह इत्तर यंत्रणा पडली बंद
  • जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात, चंद्रकांत पाटलांची टीका
  • छत्रपती संभाजीराजे भाजपवर ऐवढे नाराज का आहेत?;
  • “देशमुख, मलिकांनंतर आता परबांचा नंबर; अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी”

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group