अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनालीने चाहत्यांना तिचा हा लग्नसोहळा अनुभवता येणार असे संकेत दिले होते.सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांना या लग्नसोहळ्याला उपस्थित राहाण्याचं निमंत्रणही दिलं होतं. आता या लग्नसोहळ्याची झलकही चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
अशातच सोनालीवर दुःखाचा डोंगर पसरला आहे. सोनालीच्या सर्वात जवळीच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. सोनाली कुलकर्णीची सर्वात जवळची व्यक्ती तिची आजी सुशीला कुलकर्णी आता या जगात नाही. रविवारी तिच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समोर आली. सोनालीनं तिच्या इन्स्टाग्रामवर आजीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
व्हिडीओ शेअर करत सोनालीनं म्हटलं की, ‘आजी तू आमच्यात असशील.. आम्ही असे पर्यंत’. सुशीला कुलकर्णींच्या जाण्यानं सोनाली आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी तीन पुन्हा एकदा आपल्या पतीशी लग्नगाठ बांधली होती हा विवाह सोहळा तिच्या घरी मराठमोळ्या पद्धतीने पार पडला होता या विवाह सोहळ्याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकॉउंटवर शेअर केले होते.