सोनाली फोगटची हत्या झालेल्या गोव्यातील ‘त्या’ क्लबवर गोवा सरकारने चालवला बुलडोझर

 

भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या कर्लीज रेस्टॉरंटवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मृत्यूच्या आधी सोनाली फोगाट याच रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होत्या. इथेच त्यांना जबरदस्ती ड्रग्ज देऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यामुळं हे रेस्टॉरंट चर्चेत आलं होतं. कर्लीज रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश २०१६सालीच देण्यात आले होते. मात्र, कोर्टाच्या कामकाजामुळं ती कारवाई करण्यात आली नव्हती. सीआरझेडचे उल्लंघन केल्याचा आरोपामुळं या रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात येत आहे.

कर्लीज रेस्टॉरंटला बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आलं आहे. यासाठी मोठ्या संख्येन पोलिस, ग्राम पंचायतचे सदस्य तैनात करण्यात आले होते. रेस्टॉरंट पाडण्याआधी कर्मचाऱ्यांना आपले सामान दुसरीकडे हलवण्याचा वेळ देण्यात आला होता. हे रेस्टॉरंट गोव्यातील अंजुना समुद्रकिनारी असून अनेकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं.

सीआरझेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २१ जुलै २०१६ रोजी हे रेस्टॉरंट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन नून्सच्या पत्नीने या आदेशाचा फेरविचार व्हावा अशी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यामुळं ती कारवाई तूर्तास थांबवली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा कोर्टाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Team Global News Marathi: