आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु मुख्यमंत्री शिंदेंनीच शिरसाटांना मुंबईत येऊन उपचार घेण्यासंदर्भात विचारणा केली, असता त्यांना तातडीने काल सायंकाळी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना करण्यात आले होते.
त्यानुसार आता त्यांच्यावर मुंबईत लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संजय शिरसाट यांना भेण्यासाठी थेट लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.तसेच, शिरसाट यांच्यावर अँजोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी दिली आहे. शिरसाट यांची प्रकृती उत्तम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज रुग्णालयात दाखल होत शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यापूर्वीही शिंदे यांनी फोन करून शिरसाटांच्या परिवाराला धीर दिला होता. यासोबतच शिरसाट दवाखान्यात दाखल झाल्याचे कळताच एकनाथ शिंदे यांनी सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी वारंवार संपर्क साधून शिरसाट यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली होती.