स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त सोमवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्र लावण्यात आलं. संबंधित तैलचित्राचे अनावरण करण्यासाठी विधानभवनात सरकारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमात सरकारच्यावतीने अनेक नेत्यांनी भाषणे केली. पण या कार्यक्रमात एक विचित्र प्रकार घडला. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणे यांच्या भाषणावर यांनी आक्षेप घेतला होता.त्यांच्या याच कृतीवर नारायण राणे यांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर निलम गोऱ्हे यांनी नारायण राणे यांना भाषण थांबवण्याची विनंती केली होती. पण नारायण राणेंनी भाषण थांबवण्यास नकार दिला. ‘मी बसून बोलणाऱ्या लोकांचं ऐकत नाही’, असे उलट उत्तर राणेंनी दिले.
नारायण राणे यांचे भाषण सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ उठून सभागृहातून बाहेर निघाले. यावेळी राणेंनी त्यांना रोखले, त्याचवेळी भुजबळांनी त्यांना हात दाखवला. यावर राणे म्हणाले कि, भुजबळांचं मला समर्थन आहे, म्हणूनच त्यांनी हात दाखवला. नारायण राणेंच्या औचित्यभंग करणाऱ्या भाषणामुळे टीकेचा सूर उमटत असताना नीलम गोऱ्हे यांनी विधानसभा सभापती नार्वेकर यांना भाषण थांबवायला सांगितलं. यावर “मी बसून बोलणाऱ्यांची ऐकत नसतो” असे उलट उत्तर राणेंनी गोऱ्हे यांना दिले