Tuesday, June 6, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

by ग्लोबल न्युज नेटवर्क
August 12, 2020
in आरोग्य, जनरल
0
श्री विठ्ठल मंदिर आले रूग्णांच्या मदतीला धावून , दोन ऑक्सिजन मशीनचे रूग्णालयास हस्तांतरण

पंढरपूर– कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील रूग्णांच्या सोयासाठी उपजिल्हा रूग्णालयास हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची आवश्यकता होती व त्यांनी याची मागणी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडे केली होती. समितीने धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेवून तीन मशीन देण्यास मान्यता दिली होती व यापैकी दोन मशीनचे आज हस्तांतरण करण्यात आले.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराने कोरोना काळात मोठी मदत आजवर केली आहे. यापूर्वी उपजिल्हा रूग्णालयात तेथील कर्मचारी व अधिकार्‍यांना पीपीई किटस् आवश्यक सामुग्री दिली होती. याच बरोबर कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात गरजूंना अनेक दिवस अन्नदान मोहीम राबविली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक कोटी रूपये देवू केले होते. विशेष म्हणजे मंदिर गेले पाच महिने बंद असले तरी समितीच्या वतीने अखंड उपाय योजनांमध्ये योगदान दिले जात आहे. यासाठी समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

पंढरपूर व परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर येथे उपचारासाठी येणार्‍यांना आवश्यक असणार्‍या हाय फ्लो ऑक्सिजन मशीनची कमतरता भासत होती. यामुळे उपजिल्हा रूग्णालयाने याची मागणी मंदिरे समितीकडे केली.

समितीने याबाबत धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतली व प्रत्येकी 2 लाख 82 हजार रूपये किंमतीची तीन मशीन खरेदी केली आहेत. यातील दोन मशीन उपलब्ध झाल्या असून त्या समितीच्या वतीने वैद्यकीय अधिक्षिका डॉ.जयश्री ढवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, मंदिराचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सदस्य संभाजी शिंदे, नगराध्यक्षा साधना भोसले, ज्ञानेश्‍वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे, सुरेश कदम तसेच डॉ. प्रदीप केचे उपस्थित होते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: कोरोनापंढरपूरविठ्ठल-रुक्मिणी
ADVERTISEMENT
Next Post
हिंदकेसरी पै.मारुती माने यांची कारकीर्द आता रुपेरी पडद्यावर येणार..!

हिंदकेसरी पै.मारुती माने यांची कारकीर्द आता रुपेरी पडद्यावर येणार..!

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group