धडकी भरवणारे : कोरोना चा वेग वाढला ,देशात २४ तासांत आढळले २ लाख ३४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण 

धडकी भरवणारे : भारतात २४ तासांत आढळले २ लाख ३४ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण

 

नवी दिल्ली: भारतात २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोना रुग्ण आढळले. देशातील कोरोना रुग्णांपैकी १ लाख २३ हजार ३५४ जण २४ तासांत कोरोनामुक्त झाले. भारतात २४ तासांत १ हजार ३४१ कोरोना मृत्यू झाले.

 

देशात आतापर्यंत १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ जणांना कोरोनाची बाधा झाली. यापैकी १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात १ लाख ७५ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला. भारतात सध्या १६ लाख ७९ हजार ७४० कोरोना रुग्णांवर (कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण) उपचार सुरू आहेत.

 

भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. देशात सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत.

 

कोरोना विषाणूचे वेगवेगळे अवतार जगभर सक्रीय आहेत. यापैकी काही अवतारांवर भारतीय लस प्रभावी ठरल्या आहेत. पण आपल्या आसपास कोरोना विषाणूचा नक्की कोणता अवतार सक्रीय आहे हे सामान्य व्यक्ती ओळखू शकत नाही. याच कारणामुळे लस घेतली तरीही कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालायाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: