धक्कादायक : राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरतोय! मंगळवारी 2,172 नवे रुग्ण, 21 मृत्यू
ग्लोबल न्यूज – महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढ ब-याच दिवसांपासून मंदावली असताना, पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरायला लागला आहे. राज्यात आज (मंगळवारी) दिवसभरात 2,172 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, 21 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 61 हजार 486 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 04 हजार 831 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 1,098 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.65 टक्के एवढा झाला आहे.
राज्यात सध्या 11 हजार 492 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात सध्या 1 लाख 11 हजार 232 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 910 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 28, 2021
दरम्यान, आज दिवसभरात एकाही नवीन ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली नाही. राज्यात आतापर्यंत 167 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 91 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.