धक्कादायक ! 24 तासांत सापडले 4 लाख रुग्ण, भारत बनला एकमेव देश

धक्कादायक ! 24 तासांत सापडले 4 लाख रुग्ण, भारत बनला एकमेव देश

ग्लोबल न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत जगातील आजवरची विक्रमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात मागील 24 तासांत चार लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 24 तासांत चार लाख रुग्णांची नोंद होणारा भारत एकमेव देश बनला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 4 लाख 01 हजार 993 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 56 लाख 84 हजार 406 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 2 लाख 99 हजार 988 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या भारतात 32 लाख 68 हजार 710 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 3 हजार 523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 11 हजार 853 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌.

देशात आजवर 28 कोटी 83 लाख 37 हजार 385 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 19 लाख 45 हजार 299 चाचण्या शुक्रवारी (दि. 30) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. देशात आजपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: