शिंदे गटाने पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का दिला आहे. शिंदे गटात सामील होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आता माजी आमदार अर्जुन खोतकर यांची भर पडली आहे. चार दिवसांपूर्वी खोतकर दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अखेर खोतकर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे यांच्या बंडानंतर अनेक शिवसेनेचे आमदार आणि खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडतांना पाहायला मिळत आहे. त्यातच आता माजी आमदार आणि खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत आहे. जालना जिल्ह्यातील महत्वाचे नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सुद्धा आता शिंदे गटात प्रवेश केला आहे.
ईडीच्या कारवाईमुळे खोतकर शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र खोतकर यांनी या अफवा असल्याचा खुलासा केला होता. मात्र आज प्रत्यक्षात खोतकर शिंदे गटात सहभागी झाली आहे. यावर आता शविसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे काही दिवसांपूर्वी शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अर्जुन खोतकरांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला होता मात्र काही दिवसात त्यांनी शिंदे गटात सामील झाले आहे.
‘गली गली मै शोर है, धैर्यशील माने चोर है’ संतप्त शिवसैनिक घोषणा देत धडकले मानेंच्या घरावर