शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आमदार रोहित पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
तसेच, पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारेच पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केले आहेत.
शिवसेनेनंतर आम्हालाही लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, असं सांगताना रोहित पवारांनी आमच्या कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट असल्याचंही रोहित पवार यांनी सांगितलं. आता रोहित पवार यांनी केलेल्या या आरोपांना विरोधक अशाप्रकारे प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.