खाजगीकरणाच्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक

खाजगीकरणाच्या विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक

काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने अनेक सरकारी कंपन्या खाजगी तत्वावर खाजगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला होता होता. या निर्णयाविरोधात आता शिवसेना आक्रमक झालेली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारला आहे.

जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, असे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत म्हटले आहे. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील या मुद्याकडे सुद्धा केंद्रातील नेत्यांचे खासदार राऊत यांनी लक्ष वेधले आहे.

मराठा आरक्षण लढा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, आता परिस्थिती अशी आहे की आमचा जीडीपी आणि आमची आरबीआयही दिवाळखोर झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि इतर बर्‍याच ठिकाणी विक्रीसाठी मोठी विक्री आणली आहे. यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश आहे, असे राऊत यांनी बोलून दाखविले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: