मंत्री तानाजी सावंत यांचा काल सोलापूर जिल्हा दौरा झाल्यानंतर शिल्लक सेना व पेंग्विन सेनेच्या काही नौटंकी कलाकारांनी रस्ता गोमुत्राने स्वच्छ करून घेणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शुद्धीकरण करणे अशी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आंदोलने केली या कृतीचा सोलापूर जिल्हा शिवसेना निषेध करत असून आगामी काळात अशी नौटंकी केल्यास अशा नोटंकी कार्यकर्त्यांना त्यांची जागा शिवसैनिक दाखवून देतील असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.
अशा वैफल्यग्रस्त कार्यकर्त्यांना आपण असे कृत्य केल्यानंतर शिल्लक सेना व पेंग्विन सेनेचे अध्यक्ष आपला पर्यावरण खाते व मुंबई महानगरपालिका मधील भ्रष्टाचाराच्या खोक्यांनी भरलेल्या मातोश्री मध्ये आपला सत्कार करतील अशा आशेने हे आंदोलने केली जातात. अशा करणाऱ्या भोंदू कार्यकर्त्यांना जिल्हा ओळखून आहे.सोलापूर जिल्ह्यातील सध्याच्या शिल्लक सेना व पेंग्विन सेनेचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर खोके मातोश्री चा विश्वास नसल्यामुळे वाळू तस्करांना पदे द्यावी ही लागत आहेत याचीही दखल जनतेने घेतलेली आहे.