शेतकरी देशाचा अन्नदाता त्यांचा अंत बघू नका, शरद पवारांचे केंद्र सरकारला आवाहन

शेतकरी देशाचा अन्नदाता त्यांचा अंत बघू नका, शरद पवारांचे केंद्र सरकारला आवाहन

आज कृषी कायद्याविरोधात आंदोलनाचा १६ वा दिवस आहे. त्यात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनावर वेळीच निर्णय घ्या. शेतकरी हा देशाचा अन्नदाता, त्यामुळे त्या अन्नदात्याचा अंत बघू नका, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्राला केले आहेत.

शेतकऱ्यांच्या या सर्व ज्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये मुख्यत: तीन शेतकरी बिलाबाबत आहेत. या तिनही बिलांसंबंधी संसदेत जेव्हा ही बिलं आली, त्यावेळी सगळ्यांच्या वतीने सांगण्यात आलं की, घाईघाईने इतक्या महत्त्वाचे तीन कायदे चर्चा न करता मंजूर करणं, हे आज जरी तुम्हाला शक्य असले, तरी उद्या तुम्हाला त्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून निघाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुम्ही घाई करु नका असे शरद पवारांनी सांगितलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: