Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सेक्सटॉर्शनला घाबरून पुण्यात तरुणाने संपवले आपले जीवन

by Team Global News Marathi
October 12, 2022
in क्राईम
0
सेक्सटॉर्शनला घाबरून पुण्यात तरुणाने संपवले आपले जीवन

 

पुण्यातील धनकवडी येथील एका तरुणाने सेक्सटॉर्शनला कंटाळून आपले जीवन संपवले. अमोल गायकवाड असे या व्यक्तीचे नाव असून त्याला एका तरुणीने नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. पैसे पाठवूनही मेसेज येत राहिल्याने गायकवाड यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र, सेक्सटॉर्शनला कंटाळून ही पहिलीच आत्महत्या असल्याचे सायबर पोलिसांचं म्हणणे आहे.

सायबर सेक्सटॉर्शन म्हणजे काय ?

हा सोशल मीडियामार्फत होणारा लैंगिक शोषणाचा प्रकार आहे. हा गुन्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे घडतो. जिथे गुन्हेगार बनावट प्रोफाईल बनवतात त्यानंतर ते अनोळखी लोकांशी ऑनलाईन घट्ट मैत्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. एकदा ओळख झाली की, ते त्यांच्या पीडितांना नग्न फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी प्रोत्साहित करतात.

व्हिडीओ कॉल करत नग्न व्हायला सांगतात आणि तो फोन रेकॉर्ड करतात. एकदा त्यांच्याकडे असे फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर त्यांना हे व्हिडीओ पाठवून छळ करतात. पैशांची मागणी करतात. पैसे दिले नाही तर सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देतात. सुरुवातीला तरुणांना या जाळ्यात कसं अडकवता येईल याचा विचार केला जातो.

आज अनेक तरुण वाहत जात अशा प्रकारच्या जाळ्यात अडकतात. या सगळ्यासाठी वयाची मर्यादा नाही. सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकाला अशा प्रकारची वर्तवणूक करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं. तरुण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, चॅटिंग अॅप्स आणि डेटिंग अॅप्समध्ये तरुण मोठ्या प्रमाणावर गुंतले असतात. त्यामुळे त्यांनाच या सगळ्यासाठी टार्गेट केलं जातं. पैसे उकळण्याचे सर्वाधिक वापरले जाणारे शस्त्र म्हणजे सेक्सटॉर्शन. फेसबुक, व्हाट्सअपवर अज्ञात व्यक्तीशी ओळख करून नंतर व्हिडिओ कॉल आला तर जरा विचार करा कॉल लगेच स्वीकारू नका.

जर व्यक्ती ओळखीची असेल तर त्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारून ओळखीच्या व्यक्तीचाच कॉल स्वीकारा. कारण व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना विवस्त्र असल्याचे भासवून हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जाण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यामुळे असा प्रकार तुमच्यासोबत घडले असेल तर टोकाचे पाऊल न उचलता पोलिसांना याबाबत कळवा असे सायबर एक्सपर्ट रितेश भाटिया यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार

कारागृहात पती-पत्नीला एकांतात भेटण्याची सोय, शारीरिक संबंधही ठेवता येणार

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group