नागपूर | सध्या सचिन तेंडुलकर आपल्या संपूर्ण परिवारासोबत नागपूर जिल्ह्यातील उमरेड कऱ्हाड आणि ताडोबा याठिकाणी कुटुंबीयांसोबत अनेकदा वाघोबाच्या दर्शनाला आला आहे. यानंतर तो पुन्हा जंगलसफारीसाठी ताडोबाला रवाना झाला आहे. नुकतंच त्याचं नागूपर विमानतळावर त्याचं आगमन झालं आहे. विमानतळावर लॅन्ड होताच सचिन स्वत: ड्राइव्ह करत वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबाला रवाना झाला आहे.
यावेळी सचिन बरोबर त्याचं कुटुंबही होतं. गेली अनेक दिवस लॉकडाऊनमुळे घरातच राहिल्यानंतर सचिन तेंडूलकर आपल्या कुटुंबासोबत ताडोबाच्या जंगलसफारीसाठी रवाना झाला आहे. यावेळी नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तो स्वत: ड्राइव्ह करत ताडोबाला गेला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
सचिन तेंडूलकर आपल्या कुटुंबीयांसोबत जंगलसफारीसाठी याठिकाणी आला आहे. यातून त्याचं वाघांप्रती असलेलं प्रेम दिसून येतं. यापूर्वी तो उमरेड कऱ्हाड आणि ताडोबा याठिकाणी वाघोबाचं दर्शन घेण्यासाठी मुक्कामी थांबला होता. यावेळीही तो ताडोबाच्या चिमूर भागातील एका खाजगी रिसॉर्टमध्ये मुक्कामी राहणार आहे.