पोलीस दलातून निवृत्त झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. पाच जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे.30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.
संजय पांडे ज्यावेळी DG होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच NSE सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती.
या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करु शकते, असे म्हटले जातेय.