शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेनेमध्ये मोठा संषर्ष निर्माण झाला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. पण, जहालत (मुर्खपणा) हे एका प्रकारे मृत्यूच आहे, अशा शायरीच्या अंदाजात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारून काढलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटातील अनेक आमदारांनी उघडपणे राऊतांवर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि संजय राऊत असा सामना रंगला आहे. आताही संजय राऊत यांनी ट्वीट करून शिंदे गटाला डिवचलं आहे. राऊतांनी एक शायरीच्या फोटो ट्वीट करून टोला लगावला आहे. ‘जहानत एक किस्म ही मौत होती है, और जाहील लोग चलती फिरती लाशे हैं’ असं म्हणत संजय राऊत यांनी 40 लोकांचे मृतदेह गुवाहाटीवरून येतील या वक्तव्यावर एका प्रकारे खुलासा केला आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
दरम्यान, ईडीने संजय राऊत यांनी समन्स बजावलं आहे. ईडीने त्यांना उद्या म्हणजेच मंगळवारी चौकशीसाठी हजर राहाण्याचे आदेश दिले आहे. मात्र, आपल्याला उद्या चौकशीसाठी हजर राहाता येणार नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. माझी अलिबागला सभा आहे आणि इतरही अनेक ठिकाणी सभांचं आयोजन केलं आहे. त्यामुळे मंगळवारी मी त्या सभेला जाणार आहे आणि ईडीकडे वेळ मागणार आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.