टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर एकचं खळबळ उडाली होती. त्यात १५ दिवस गायब असलेले संजय राठोड आपल्या संपूर्ण परिवारासोबत पोहरादेवीच्या दर्शनासाठी गडावर पोहचले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. यावर आता विरोधकांनी जोरदार टीका केली आहे.
यावर आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात लाड यांनी ट्विट केले आहे. ते ट्विट करून म्हणतात की, “संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे. ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी? जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सीबीआय चौकशीला सामोरे जावे! असे ट्विट त्यांनी केले आहे.
तसेच मंत्रीपदाचा गैरवापर मंत्रिपदावर असल्याने समाजातील लोकांना आकर्षित करणं, लोकांना फसवणे हा मंत्री संजय राठोड यांनी स्वतःचा धंदा बनवून ठेवला आहे. जनतेला सर्व काही समजतं आहे, तुम्ही जर गुन्हा केला नव्हता तर १५ दिवस बिळात लपून का बसला होता? हा प्रश्न जनता व आम्ही विचारत आहोत. त्यामुळे बिळातून बाहेर आलेला हा जो नागोबा आहे, या नागोबाचं डोकं ठेचल्याशिवाय भाजपा गप्प बसणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राठोड यांचे स्पष्टीकरण नसून थोतांड आहे.ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे सरकार असल्यामुळे निष्पक्ष चौकशी होईल ही अपेक्षा ठेवावी तरी कशी?जर संजय राठोड निर्दोष असतील तर त्यांनी सी.बी.आय चौकशीला सामोरे जावे!@Dev_Fadnavis @ChDadaPatil @ChitraKWagh @BJP4Maharashtra pic.twitter.com/9DgupYjnsi
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 23, 2021