आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर वानखेडे यांच्यासंबंधित जन्मदाखल्याचा फोटो आणि पहिल्या लग्नातील फोटो शेअर केला होता. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती आता त्या पाठोपाठ सचिन वानखडे यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत आहे.
त्यातच आता समोर आलेल्या माहिती नुसार एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने समीर वानखडे यांच्यावर जो आरोप केला आहे त्याची चौकशी केली जाणार असून एनसीबीच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक उद्या मुंबईत त्यासाठी दाखल होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे. एनसीबीचे दिल्लीतील डीडीजी दर्जाचे अधिकारी ज्ञानेश्वरसिंह आणि एनसीबीचे दोन वरिष्ठ निरीक्षक असे तीन जणांचे पथक आज चौकशीसाठी मुंबईत येत आहे. मात्र या आरोपांवर आता ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आपले म्हणणे मांडले आहे.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मंगळवारी एनसीबीचे डिडिजी मुठा अशोक जैन यांची भेट घेतली. यावेळी त्याच्यांसोबत लष्करातील माजी अधिकारी , एनसीबीचे पंच फ्लेचर पटेल आदी होते. त्यांनी एनसीबीच्या कारवाईला आपला पाठिंबा व्यक्त केला. सुधीर सावंत हे सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. यापुढे अनेक माजी सैनिक पंच म्हणून पुढे येणार असल्याच त्यांनी सांगितलं आहे.
गुजरातेत ३ हजार कोटी रुपयांचं ड्रग्स सापडलं पण त्यावर कारवाई होत नाही. सैनिक फेडरेशन समीर वानखेडे यांच्यासोबत आहे. आमचे १७ जण आता पंच म्हणून काम करत आहेत. एनसीबीला पूर्ण स्पोर्ट करणार. आम्ही शरद पवार यांचीही भेट घेणार आहोत. आमच्या फ्लेचर पटेल याच्यावर चुकीचा आरोप केला आहे, असे सुधीर सावंत म्हणाले.